Gujarat Election Record break Win: गुजरात निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येत असून भाजप (BJP) 156 जागांवर विजयी होत असल्याचे चित्र आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार, भाजपने 124 जागांवर विजय मिळवला असून 32 जागांवर आघाडीवर आहे. भाजपचा हा विजय गुजरात विधानसभा निवडणुकांमधील (Gujarat Assembly Election Recordbreak Winning) सर्वात मोठा विजय ठरला आहे. त्याशिवाय, भाजपने 20 वर्षांपूर्वीचा सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम मागे टाकला आहे. भाजपने 37 वर्ष काँग्रेसचा (Congress) जुना मोठा विजय मिळवला आहे. माधवसिंह सोळंकी (Madhav Singh Solanki) यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने 1985 मध्ये 149 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या जागांमध्ये घट झाली. 


Gujarat Election Result Live  : काँग्रेसला सर्वाधिक जागा (Congress Gujarat Election Record)


गुजरातमध्ये काँग्रेसची मोठी राजकीय ताकद होती. त्यांच्यानंतर जनसंघ, जनता दल आणि भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. गुजरातमध्ये झालेल्या 1980 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 141 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर 1985 च्या विधानसभा निवडणुकीत 149 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुका माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्त्वात लढवण्यात आल्या होत्या. 


1985 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 149 जागांवर विजय मिळला होता. तर, जनता पार्टीला 14 आणि भाजपला 11 जागांवर विजय मिळवला होता. अपक्षांनी 8 जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी अमरसिंह चौधरी हे मु्ख्यमंत्री झाले होते. 1989 मध्ये माधवसिंह सोळंकी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा आली. चौधरी हे गुजरातचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते. 


1980 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 141 जागांवर विजय मिळाला होता. तर, जनता पार्टीला 21 आणि जनता पार्टी (सेक्युलर)1 आणि भाजपला 9 जागांवर विजय मिळाला होता. त्याआधी 1980 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 141 जागांवर विजय मिळाला होता. 


Gujarat Election Result Live  : कोण होते माधवसिंह सोळंकी? (Who Was Madhav Singh Solanki)


काँग्रेस नेते माधवसिंह सोळंकी गुजरातचे तब्बल तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. आजच्या मतमोजणीत भाजपला जे अभूतपूर्व यश मिळालंय, तसंच यश यापूर्वी काँग्रेसच्या माधवसिंह सोळंकी यांनी मिळवले. त्यांच्या या यशाचं महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण. त्यावेळच्या बक्षी आयोगाच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांनी हे आरक्षण दिलं होतं. या आरक्षणानंतर संबंध गुजरातमध्ये आरक्षणा विरोधात हिंसक निदर्शने झाली होती. या दंगली आणि हिंसक आंदोलनात अनेकांचा मृत्यू झाला होता. 


माधवसिंह सोळंकी पहिल्यांदा डिसेंबर 1976 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले माधवसिंह सोळंकी जेमतेम चार-साडेचार महिने पदावर राहिले. एप्रिल 1977मध्ये त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्यांदा 1980 मध्ये ते मुख्यमंत्री झाले. केंद्रातील जनता पक्षाच्या सरकारने लादलेल्या राष्ट्रपती राजवटीनंतर झालेल्या निवडणुकीनंतर माधवसिंह सोळंकी प्रचंड बहुमताने सत्तेत आले. त्यावेळी त्यांनी 141 जागांवर काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. हा विजय त्यांनी खाप समीकरणावर मिळवण्याचं विश्लेषण त्यावेळच्या राजकीय निरीक्षणांनी नोंदवलं. त्यानंतरच 1981 ते 1985अशा पाच वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी गुजरातमधल्या सामाजिक आणि आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिलं. खाप KHAP म्हणजे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लीम यांची या समुदायाच्या मतदारांची आघाडी. 


गुजरातमधील आरक्षणविरोधी हिंसक आंदोलनानंतर राजीनामा द्यावा लागलेले मुख्यमंत्री सोळंकी 1985 मध्ये पुन्हा सत्तेत आले. तब्बल 149 जागा जिंकून माधवसिंह सोळंकी यांनी काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. माधवसिंह सोळंकी यांच्या यशाचं मुख्य कारण खाप समुदाय आणि आरक्षण हेच असलं तरी त्यांचा विजय हा गुजरातमध्ये कोणत्याही एका पक्षाला सर्वाधिक जागा जिंकून देणारा विजय होता. आजच्या मतमोजणीनंतर भाजपचे मुख्यमंत्री भूपेंदर पटेल माधवसिंह सोळंकी यांचं सर्वाधिक जागा जिंकण्याचं रेकॉर्ड मोडतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: