दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाकडून आईची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2017 03:37 PM (IST)
बेळगाव : दारू प्यायला पैसे न दिल्याने मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची घटना बेळगावात घडली. काकती पोलीस स्थानक हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील गुग्रॅनट्टी गावातील ही घटना आहे. 28 वर्षीय सुरेश देसूरकर याने आपल्या आईकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर न दिल्याने खून करून फरारी झाला होता. काकती पोलिसांनी सुरेशला अटक केली आहे. काकती पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी सांगितले की, सुरेश याने शुक्रवारी रात्री आपल्या आईकडून दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी केली होती. पैसे न दिल्याने काठीने आईच्या डोक्यात वार केला होता. मुलांकडून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या आईचा सकाळी मृत्यु झाला आहे. आपल्याच मुलाच्या हल्ल्यात 65 वर्षीय पार्वती देसुरकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी काकती पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी फरारी आरोपीस अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.