मुंबई: सीमेवर प्राणपणानं लढून देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन 'मदर डेअरी'नं सशस्त्र सेना ध्वज निधीमध्ये 10 लाखांची मदत केली आहे. मदर डेअरीने अशाप्रकारची मदत करुन जवानांसाठी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मदर डेयरी फ्रूट एंड वेजिटेवल्स प्राइवेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शिव नागराजन म्हणाले की, 'देशाच्या सुरक्षेसाठी जवानांचं योगदान आपण कधीही विसरु शकत नाही. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.'
मदर डेअरीनं भारत सरकारच्या पूर्व सैनिक कल्याण विभागाचे सचिव प्रभू दयाल मीना यांच्याकडे १० लाखाचा चेक सुपूर्द केला. यावेळी प्रभू दयाल मीना म्हणाले की, 'माजी सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करणं ही चांगली गोष्ट असून मदर डेअरीकडून देण्यात आलेला हा एक सगळ्यात मोठा संकेत आहे.'