तिरुअनंतपूरम:  ज्याची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून होती, तो अखरे दारात उभा राहिला आहे. पुढच्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.


 

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल. एबीपी माझाची मान्सून एक्स्प्रेस पावसाची वर्दी देण्यासाठी केरळमध्ये दाखल झाली आहे. केरळच्या वातावरणातील बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

 

दरम्यान पुढच्या तीन तासात अमरावती, बुलडाणा, नागपूर, नांदेडच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे.

संबंधित बातम्या


मान्सून आणि पूर्व मान्सून कसा ओळखाल?


मान्सून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात, वेधशाळेचा अंदाज


केरळात मान्सून आल्याचं कसं कळतं?


यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस : स्कायमेट