पुणे : कन्हैयाकुमारवर कथित हल्ल्याचा आरोपी असलेला मानस डेका काल खुद्द भाजपाध्यक्षांसोबत सेल्फी काढताना दिसला. त्यामुळे भाजपने संबंध नाकारलेला मानस पक्षाशी संबंधित आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 
महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या कन्हैयाला मानसने धक्काबुक्की केल्याचा आरोप होता. इतकंच नाही, तर मानस हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावाही करण्यात आला होता. पण आपण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नसल्याचा उलट दावा मानसने केला होता.

 
आसाममधल्या विजयाबद्दल रविवारी पुण्यातल्या आसामी नागरिकांच्या वतीने शाहांचा सत्कार करण्यात आला. त्याच कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मानस थेट गुवाहाटीहून आसामला आला होता. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत मानसने सेल्फी काढल्यानं तो पुन्हा चर्चेत आला आहे.