मुंबई: ज्याची तुम्ही आम्ही चातकाप्रमाणं आतुरतेनं वाट पाहत होतो, तो मान्सूनराजा देशाच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकला आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला. हवामान विभागानं याची अधिकृत घोषणा केली आहे.
केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. इथल्या सगळ्या हवामान केंद्रांवर पावसाची नोंद करण्यात आली. मान्सूनचे सगळे निकष पडताळल्यानंतर हवामान विभागानं मान्सून आल्याचं जाहीर केलं.
गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने आधीच मान्सून आल्याचं जाहीर केलं होतं.
यंदा मान्सून हा नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच दाखल झालाय. 6 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी तज्ज्ञांना आशा आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही मान्सूनचं वेळेत आगमन होईल असं म्हटलं जात आहे.
यंदा मान्सून हा सरासरी इतका राहिल असं भाकीत हवामान संस्थेनं आधीच वर्तवलंय..त्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
राज्यात बहुतांश भागात पाऊस
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून सध्या उष्णतेच्या लाटीने काही प्रमाणात माघार घेतल्याची माहिती स्कायमेटने दिली. विदर्भातील ठराविक भागात अजूनही उष्णतेचा तडाखा कायम आहे .
मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जास्त उष्णता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण विदर्भाच्या काही भागांत हलकासा पाऊस झाल्यामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली. त्यामुळे सध्या तेथील तापमान 40 अंशांपर्यंत नोंदवलं जात आहे.
दक्षिण महाराष्ट्रामध्ये 30 मे पासून मोसमी पावसाचं आगमन होईल, अशी अपेक्षा आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचं आगमन होऊ शकतं, असं स्कायमेटने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
आला रे! मान्सून अंदमानात दाखल
यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज!
मान्सून आणि पूर्व मान्सून कसा ओळखाल?
राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणी
यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!
मान्सून केरळमध्ये डेरेदाखल, महाराष्ट्रात लवकरच पाऊस येणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2018 01:23 PM (IST)
केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. इथल्या सगळ्या हवामान केंद्रांवर पावसाची नोंद करण्यात आली. मान्सूनचे सगळे निकष पडताळल्यानंतर हवामान विभागानं मान्सून आल्याचं जाहीर केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -