cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
यंदा सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांचा आज निकाल जाहीर करण्यात आला.
निकाल कुठे पाहता येणार?
विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.in, results.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे.
तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मायक्रोसॉफ्टने एक खास अॅप बनवलं असून विद्यार्थी तिथे आपला निकाल पाहू शकतात.
याशिवाय मेसेजद्वारेही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या निकालासाठी मेसेज बॉक्समध्ये जा. तिथे cbse10 <rollno> <sch no> <center no> लिहा आणि 7738299899 ह्या नंबरवर पाठवा.
निकाल कसा पाहावा?
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर क्लिक करा
- इथे तुम्हाला 10 वी आणि 12 वी असे पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला कोणता निकाल पाहायचा आहे तो निवडा.
- 10 वीचा निकाल पाहण्यासाठी CBSE 10th result 2018 वर क्लिक करा.
- तुमचं नाव, नंबर वगैरे माहिती भरल्यानंतर दहावीचा निकाल दिसेल.
- पुढील वापरासाठी तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करु शकता.
बारावीचा निकाल
तीनच दिवसांपूर्वी म्हणजेच 26 मे रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. या निकालात गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आली होती.
दहावी-बारावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर करु: बोर्ड