Monsoon 2024  : एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून काढतोय, अशातच दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिलीय.  यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.  . हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी (15 एप्रिल) पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे.  यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) चांगला पाऊस होईल, असं भाकीत IMD ने वर्तवलं आहे.


महापात्रा म्हणाले,  यंदा सामान्यहून अधिक पाऊसाचा अंदाज  आहे.  5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज  आहे. यंदा सामान्य पेक्षा चांगली परिस्थिती आहे. 8 जून पर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची परिस्थिती सध्या moderate आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल.  अल निनो चा प्रभाव कमी होतो आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.  






महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस होतो, भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.


पाऊस मोजण्याची श्रेणी कशी ठरते?


यंदाच्या हंगामात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.


हे ही वाचा :


Monsoon : यंदाचा मान्सून कसा असेल? काही राज्यांमध्ये कमी पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज वाचा सविस्तर...