Odisha New CM Mohan Manjhi : ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन मांझी यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं आहे. मोहन मांझी हे बुधवारी मु्ख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. केवी सिंह देव आणि प्रवती परिदा हे दोघेजण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मोहन मांझी यांच्या नावाची घोषणा केली. 

मोहन मांझी हे ओडिशातील केओंधार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी बिजू जनता दलाचे मीन मांझी यांचा पराभव केला. मोहन मांझी यांनी 11,577 मतांनी विजय मिळवला आहे. 

भाजपने ओडिशामध्ये पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केली आहे. भाजपने ओडिशात 147 जागांपैकी 78 जागा पटकावल्या तर बिजू जनता दलाला 51 जागांवर समाधान मानावं लागलं. बिजू जनता दलाच्या 24 वर्षांची सत्ता यंदा भाजपने मोडीत काढली.

त्याचसोबत लोकसभा निवडणुकीतही भाजपने मोठं यश मिळवलं. भाजपने राज्यातील 21 पैकी 20 जागा पटकावल्या, तर काँग्रेसला एक जागा मिळाली. बिजू जनता दलाला मात्र एकही जागा मिळाली नाही. 

 

भाजपचे पहिले मुख्यमंत्री

ओडिशामध्ये भाजपने पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केली असून मोहन चरण माझी ओडिशाचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतील. 2019 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत ते केओंधार विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. 2000 ते 2009 दरम्यान त्यांनी दोनदा केओंझारचे प्रतिनिधित्व केले.

काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह? 

केव्ही सिंग यांनीच मोहन माझी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे नाव सुचविले होते असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. इतर सर्व आमदारांनीही मोहन मांझी यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे मोहन मांझी यांची ओडिशा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

शपथविधीसाठी साधू-संतांना निमंत्रण पाठवले

केवळ उडिया भाषा बोलणारी व्यक्तीच राज्याचा मुख्यमंत्री होईल असं वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान दिलं होतं. त्यानंतर आता मोहन मांझी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ओडिशातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संत आणि ऋषींनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

ओडिशातील पक्षीय बलाबल

पक्ष          जागा
भाजपा 78
बिजू जनता दल 51
काँग्रेस 14
सीपीआयएम     01
आयएनडी 03

ही बातमी वाचा: