लखनौ : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे आयपीएलमध्ये शमीकडून चांगली कामगिरी होत असताना दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाला पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तरप्रदेशातील अमरोहामध्ये हसीन जहाला पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. हसीनने काल रात्री डिडौलीच्या सहसपुर अलीनगर गावात मोहम्मद शमीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. यानंतर शमीच्या आईने पोलिसांना याबाबत तक्रार केली. पोलिसांनी हसीनला घरातून ताब्यात घेतले आहे आणि अमरोहाच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या नजरकैदेत ठेवले आहे.

याबाबत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या हसीनने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मोहम्मद शमीच्या ओळखीच्या आणि पैशाच्या बळावर युपी पोलीस मला त्रास देत आहेत. रात्री 12 वाजता मला घरून उचलले असून मला काहीही खायला देखील दिलेले नाही, असे तिने म्हटले आहे.

पोलिसांनी काहीही दोष नसताना मला ताब्यात घेतले आहे. माझी लहान मुलगी आणि आयाला देखील ताब्यात घेतले आहे, त्यांनाही उपाशी ठेवण्यात आले आहे, असे हसीनने सांगितले. हसीन जहाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.

हसीन जहाने तिचा पती मोहम्मद शमीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार आणि जीवे मारण्याच्या धमकीसह अनेक गंभीर आरोप केले होते.

दरम्यान, शमी मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचाही खळबळजनक आरोप हसीनने केला होता. मात्र बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणात शमीला क्लीनचिट देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

मी आजही शमीवर प्रेम करते : हसीन जहां

कार अपघातात मोहम्मद शमी जखमी, डोक्याला दहा टाके

बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चिट : सूत्र

शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा 

बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी 

मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी

कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?

दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां

फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा