लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मोदी लाट दिसून येत आहे. याआधी उत्तरप्रदेशच्या मतदारांनी लोकसभेतही भाजपला भरभरुन मतं दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये भाजप आजवरचा सर्वात मोठा विजय मिळविण्याच्या तयारीत आहे.


राम मंदिराच्या आंदोलनानंतर  उत्तर प्रदेशमध्ये  झालेल्या निवडणुकीत भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता भाजप बहुमताच्याही प्रचंड पुढं गेलं आहे. त्यामुळे राम मंदिर लाटेपेक्षाही इथं मोदी लाट मोठी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भाजप उत्तरप्रदेशमध्ये आपला स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार असं चित्र दिसतं आहे. आजवर भाजपला उत्तरप्रदेशात विधानसभेत एवढ्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या.

1991 साली भाजपनं 221, काँग्रेसनं 46, जनता दलनं 92, जनता पार्टीनं 34 आणि बसपनं 12 जागा मिळवल्या होत्या.

सध्या हाती आलेले कल पाहता भाजप 300हून अधिक जागा मिळवेल असं दिसत आहे. तर इथं सपा दुसऱ्या क्रमांकावर आणि बसपा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसत आहे.

2012साली समाजवादी पक्ष 224, बसपला 80 तर भाजपला 40 आणि काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या.

आजवर उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपला मिळालेल्या जागा:

1980साली विधानसभेत भाजपला 11 जागा मिळाल्या होत्या. 

1985 साली विधानसभेत भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या.

1989 साली विधानसभेत भाजपला 57 जागा मिळाल्या होत्या.

1991 साली विधानसभेत भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या.

1993 साली विधानसभेत भाजपला 177 जागा मिळाल्या होत्या.

1996 साली विधानसभेत भाजपला 174 जागा मिळाल्या होत्या.

2002 साली विधानसभेत भाजपला 88 जागा मिळाल्या होत्या.

2007 साली विधानसभेत भाजपला 51 जागा मिळाल्या होत्या.

2012 साली विधानसभेत भाजपला 47 जागा मिळाल्या होत्या.

2017 साली विधानसभेत भाजपला 300+ जागा मिळतील असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल लाईव्ह

2019 विसरा आणि 2024 च्या तयारीला लागा : अब्दुल्ला