आठवलेंचं स्वप्न पूर्ण, भामरेंची सरप्राईज एण्ट्री
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2016 02:01 AM (IST)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात उद्या मोठे बदल होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी स्वतः सर्व मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात आले असून, उद्या यासंदर्भात घोषणा होणार असल्याचं कळतं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कोणत्या नव्या चेहऱ्याला स्थान मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील एखादा नवा चेहरा केंद्रीय मंत्रिमंडळात पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.