राजस्थानमधील अपक्ष आमदार नंदकिशोर महारिया यांचा मुलगा सिद्धार्थ महारिया हा बीएमडब्ल्यू कार चालवत होता, अशी माहिती आता पुढे येते आहे. सीसीटीव्ही फूटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दारुच्या नशेत असलेल्या बीएमडब्ल्यू कारचालकाने रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघातस्थळी तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपक्ष आमदार नंदकिशोर महारिया यांचा मुलगा सिद्धर्थ यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “दुर्घटनेवेळी मी कार चालवत नव्हतो, तर ड्रायव्हरच्या बाजूला बसलो होतो.”
पोलिसांनी सिद्धार्थविरोधात कलम 304 अन्वये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिद्धार्थ नशेमध्ये गाडी चालवत होता.
पाहा व्हिडीओ-