राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2017 10:54 PM (IST)
नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते, मात्र ते काहीसे एकाकी पडल्याचं चित्र पहायला मिळालं. अर्ज भरल्यानंतर भाजपच्या नेत्यांची फौज बाहेर आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या शेजारी लालकृष्ण अडवाणी आणि त्यानंतर रामनाथ कोविंद अशा क्रमानं चालत होते. मोदींनी शेजारीच असलेल्या अडवाणींना वगळून थेट पलिकडे असलेल्या कोविंद यांचा हात हातात घेतला आणि उपस्थितांना अभिवादन केलं. शेजारीच चालत असलेल्या अडवाणींचा त्यांना विसर पडल्याचं दिसलं. अखेर कोविंद यांनी मोदींना त्याची आठवण करुन दिली आणि अडवाणींचा हात मोदींच्या हातात दिला. मात्र यामुळे काहीशा दुखावलेल्या अडवाणींनी हलकेच आपला हात सोडवून घेतला. याची जाणीव झालेल्या मोदींनी झटकन अडवाणींचा डावा हात हातात धरुन उंचावला आणि वेळ निभावून नेली. पाहा व्हिडिओ :