दिसपूर : देशातल्या सर्वात मोठ्या डबल डेकर ब्रीजचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पायाभरणीनंतर तब्बल 21 वर्षांनी आज बोगीबील पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल आहे. आज पंतप्रधान मोदींनी संपूर्ण पुलावरुन प्रवास करत पुलाची आणि कामाची पाहाणी केली आणि त्यानंतर पुलाचं उद्घाटन केलं.

बोगीबील पुलामुळे आसामचा दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील ढेमजी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. या पुलामुळे चार तासाचा वेळ वाचणार आहे. चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पुलावरुन जाऊ शकतात अशी या पुलाची बांधणी करण्यात आली आहे.

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वाधिक लांबीचा दुमजली रेल-रोड पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले. हा दुमजली पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल 21 वर्षांचा कालावधी लागला. ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल 4.94 किलोमीटर अंतराचा आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील दक्षिण-उत्तर भागाला जोडणारा हा पूल आहे.

दुमजली पुलावर रेल्वेसाठीच्या दोन मार्गिका करण्यात आल्या असून रस्ते वाहतुकीसाठी तीन मार्गिका आहे. या पुलावरुन 100 किलोमीटरच्या वेगाने ट्रेन धावू शकते. हा पूल बनवण्यासाठी 5800 कोटींचा खर्च आला.