लखनौ: बसपा अध्यक्षा मायावती यांनी नोटा बंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदींचा हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे. असा आरोप मायावती यांनी केला आहे.


भाजपनं पुढच्या 3 वर्षांसाठी सर्व पैसा जमा केला आहे. आश्वासनं पूर्ण न केल्यानं त्यावरुन जनतेचं लक्ष हटावं. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही मायावती यांनी म्हटलं आहे.

'मोदींच्या या निर्णयानं काळाबाजार वाढला आहे. रुग्णालय आणि मेडिकल स्टोरवर लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.' असंही मायावती म्हणाल्या.

देशातील प्रत्येक स्तरामधील नागरिकांमध्ये या निर्णयानं निराशा पसरली आहे. असंही मायावती म्हणाल्या.