मोदी सरकार मला संपवू शकतं: केजरीवाल
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2016 02:29 PM (IST)
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी सरकार सध्या सैरभैर झाले असून, हे सरकार मला संपवू देखील शकते, असा आरोपच त्यांनी केला आहे. केजरीवालांनी आज पंतप्रधानांवर व्हिडीओ अस्त्र उगारून, मोदींवर मुस्कटदाबीचाही आरोप केला आहे. केजरीवालांनी आज एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, यामध्ये आमदारांचे अटक सत्र, आणि संसदीय सचिवांच्या मुद्द्यवरून आमित शाह आणि मोदींना दोषी ठरवले आहे. विशेष म्हणजे, केजरीवालांनी ट्विटरवरूनही आपला राग व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये मोदीजी तुमच्या आजाराचे नाव केजरीवाल असून, हा व्हायर सर्व देशात पसरत असल्याचे म्हटले आहे.