बँकांमध्ये जुन्या 500, 1000 च्या नोटा बदलून मिळणार नाही
या निर्णयानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्व सामान्यांना पडणाऱ्य काही प्रश्नांची उत्तर :
प्रश्न : आता पाचशे, हजारच्या जुन्या नोटा बदलून मिळणार का?
उ : नाही, आता बँक, पोस्ट ऑफिस या ठिकाणी नोटा बदलून मिळणार नाहीत. बँकेत हजारच्या नोटा फक्त जमा करता येतील. त्यानतंर एटीएमद्वारे पैसे काढता येतील.
प्रश्न : ज्या ठिकाणी आतापर्यंत जुन्या नोटा चालत होत्या, त्या ठिकाणी सध्या चालतील का?
उ : महत्वाच्या ठिकाणी जुन्या नोटा आता 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यास मुदतवाढ दिली आहे. पण आता फक्त 500 च्या नोटा स्वीकारल्या जातील.
या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा चालणार
प्रश्न : हजारची नोट आता कुठेच चालणार नाही का?
उ : नाही, सरकारने आतापर्यंत जुन्या नोटा वापरण्याची मुभा दिली होती. त्या ठिकाणी देखील हजारची नोट चालणार नाही.
प्रश्न : सरकारने जुन्या पाचशेच्या नोटा वारण्यास आणखी कुठे-कुठे परवानगी दिली आहे?
उ : सरकारी शाळा, महाविद्यालयांची 2 हजार रुपयांपर्यंतची फी 500 च्या नोटांमध्ये भरु शकता. शिवाय प्री पेड मोबाईल ग्राहक रिचार्जसाठी 500 ची नोट वापरु शकतात.
प्रश्न : सरकारने कोणते नवीन बदल केले आहेत?
उ : ग्राहक को-ऑपरेटिव्ह दुकांनांमध्ये एका वेळी 5 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
नाशिकमधून 2 कोटी 45 लाख नोटांचं हवाई उड्डाण
प्रश्न : परदेशी नागरिकसुद्धा नोटा बदलू शकणार नाहीत का?
उ : परदेशी नागरिक एका आठवड्याला पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम बदलून घेऊ शकतात. याची पासपोर्टमध्ये नोंद होईल.
प्रश्न : टोलवर आता पैसे द्यावे लागणार का?
उ : राष्ट्रीय महामार्गावर आता 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे. मात्र 3 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशेच्या नोटा टोलवर स्वीकारल्या जातील. अनेक टोलवर स्वाईप मशिनची सुविधा देखील देण्यात येणार आहे. यामुळे क्रेडिट-डेबिट कार्डचा वापर करुन पैसे देता येतील.