नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा लकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते.

 

मंत्रिमंडळातील संभाव्य नावं आणि बदलांबद्दल या बैठकीत चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुका पाहता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या खासदारांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

 

तर सध्या काही मंत्र्यांना बढतीही मिळण्याची शक्यता आहे. पियूष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.