मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, कोणाला कोणतं मंत्रालय
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2016 04:22 PM (IST)
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात नवीन 19 मंत्र्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रकाश जावडेकर यांना मनुष्यबळ विकास मंत्रालय सोपवण्यात आलं असून स्मृती इराणी यांना पदावरुन हटवण्यात आलंय. नरेंद्र सिंह तोमर यांची ग्रामविकास मंत्रिपदी वर्णी लागली आहे. रामदास आठवलेंना सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर सुभाष भामरे यांना संरक्षण मंत्रालयाचं राज्यमंत्रिपद सोपवलं आहे.