नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आतापर्यंत अनेक पुस्तकं आणि एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता त्यामध्ये आणखी एका पुस्तकाची भर पडत असून ‘Modi @ 20’ या पुस्तकाचे येत्या एप्रिलमध्ये प्रकाशन होणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्याला गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी 20 वर्षे पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मुख्यमंत्रीपदाच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘Modi @ 20: Dreams Meet Delivery’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. रुपा प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे येत्या एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत प्रकाशन करण्यात येत आहे.


 






या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालावर अनेक दिग्गजांनी भाष्य केलं आहे. त्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, नंदन निलकेनी, सदगुरू, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पीव्ही सिंधू, अनुपम खेर यांचा समावेश आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha