मुंबई : महाराष्ट्राची शान असलेले दोन पदार्थ पोस्टाच्या तिकिटांवरही झळकणार आहेत. भारतीय पोस्ट खात्यानं प्रदर्शित केलेल्या भारतातील 24 खाद्यपदार्थांच्या पोस्ट तिकिटांमध्ये मोदक आणि वडापाव या पदार्थांना स्थान मिळालं आहे.


भारतीय पोस्ट खाते डिजीटल युगात मागे पडत असलं तरी, या खात्याचे काही उपक्रम सर्वांचंच लक्ष वेधून घेत असतात. पोस्ट विभाग दरवर्षी नवनवीन पोस्टाची तिकीटं प्रदर्शित करत असतं. यावेळी भारतीय खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक खाद्य दिनी या स्टॅम्प्सचं प्रकाशन केलं.

उकडीचे मोदक हा गणेशोत्सव किंवा संकष्टी-अंगारकीला महाराष्ट्रातील घराघरात केला जाणार गोडाचा पदार्थ आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या मनात या पदार्थाला वेगळंच स्थान आहे. उकडलेल्या तांदळाच्या पिठीत खोबऱ्याचं गोड सारण भरुन केल्या जाणाऱ्या मोदकांची चव अनेकांच्या जिभेवर रेंगाळते.

दुसरीकडे, वडापाव हा मुंबईतील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. अनेकांसाठी वडापाव म्हणजे एकवेळचं जेवण. घड्याळाच्या काट्यावर धावताना सर्वत्र मिळणारा वडापाव कुठेही पटकन खाता येतो आणि पोटाची भूक भागवता येते.

कोणकोणत्या पदार्थांचा समावेश?

हैदराबादी बिर्याणी

बघारे बैंगन

शेवया

तिरुपतीचे लाडू

इडली

डोसा

पोंगल

ढोकळा

राजभोग

दालबाटी

लिट्टी चोखा

गोलगप्पा

मोदक

वडापाव

सरसों दा साग, मक्के की रोटी

मोतिचूर लाडू

पोहा जलेबी

पेढा

संदेश

ठेकुआ

मालपोआ