लवकरच इंटरनेटविना मोबाईल बँकिंग शक्य होणार!
एबीपी माझा वेब टीम | 05 Dec 2016 11:27 AM (IST)
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सरकारने कॅशलेस इकोनॉमीच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळेच सरकारने आता इंटरनेटविना साधारण फोनही मोबाईल बँकिंगचा वापर करु शकतील, असे फोन टेलिकॉम कंपन्यांना बनवण्यास सांगितले आहेत. सरकारकडून अनेक वर्षानंतर अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंटरी सर्व्हिस डेटा म्हणजेच यूएसएसडी पद्धत सुरु करण्यासाठी हाचचाली होत आहेत. या तंत्रामुळे बँक खात्यातील रक्कम पाहणे, फंड ट्रान्सफर असे कामं इंटरनेटविना देखील केले जातील. केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी शनिवारी बँकिग, टेलिकॉम, मोबाईल आणि पेमेंट इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. सरकार यूएसएसडीला प्रोत्साहन देणार असून टेलिकॉम कंपन्यांनी हा मुद्दा प्राधान्याने घ्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.