हॉस्पिटलबाहेर जयललिता समर्थकांचं ठाण, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
एबीपी माझा वेब टीम | 05 Dec 2016 08:32 AM (IST)
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या प्रमुख जे जयललिात यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समजताच, चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली. गर्दी लक्षात घेऊन निमलष्करी दलाला तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अपोलो हॉस्पिटलबाहेर 200 अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याची चर्चा करुन जयललिता यांच्या तब्येतीची विचारणा केली. तसंच राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.