Uttar Pradesh Train Accident : उत्तर प्रदेशातील मिर्जापूर (Mirzapur) जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनवर (Railway Station) बुधवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात (train accident) झाला. कालका मेल (Kalka Mail) च्या धडकेत सहा भाविकांचा मृत्यू झाला. रेल्वे पटली क्रॉस करताना या भाविकांचा अपघात झाला. ही घटना इतकी भीषण होती की मृतदेहांच्या चिंधड्या उडल्याचं दिसून आलं. सर्व प्रवासी कार्तिक पौर्णिमेसाठी (Kartik Purnima) गंगा स्नान करण्यासाठी आले होते. या दुर्घटनेनंतर स्टेशनवर काही काळ गोंधळ माजला.
रेल्वे पोलिस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह हटवले. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, अनेकांनी रेल्वे प्रशासनावर (railway administration) बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे.
Accident While Crossing Railway Track : रेल्वे पटली क्रॉस करताना अपघात
बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास गोमो-प्रयागराज एक्सप्रेस (Gomo Prayagraj Express) येथून उतरलेले प्रवासी चुकीच्या दिशेने रेल्वे लाईन पार करत होते. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून हावडा-कालका मेल (Howrah-Kalka Mail) वेगाने जात होती आणि या ट्रेनच्या धडकेत सहा भाविक जागीच ठार झाले.
UP Train Accident : शव ओळख पटवणे कठीण
हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचे तुकडे ओळखणे अवघड झाले होते. जीआरपी आणि आरपीएफ जवानांनी (GRP and RPF personnel) काळजीपूर्वक शव गोळा करून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले. या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे.
CM Yogi Adityanath : मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आणि मदतकार्य (relief operations) गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF)च्या टीमना देखील तातडीने पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
ही बातमी वाचा: