Continues below advertisement

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमधील बिलासपूर (Bilaspur) येथे लालखदान (Lalkhadan Train Accident) रेल्वे स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. हावड़ा (Howrah) रूटवर चालणारी पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेकजण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाने त्वरित रेस्क्यू टीम (rescue team) आणि मेडिकल युनिट (medical unit) घटनास्थळी पाठवले आहे. स्थानिक प्रशासनही मदतीसाठी पोहोचले आहे. या अपघातामुळे संपूर्ण रूटवरील अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या असून काहींना पर्यायी मार्गान वळवण्यात आलं आहे.

Continues below advertisement

Bilaspur Train Accident : समोरासमोर धडक

कोरबा (Korba Passenger Train) पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात आतापर्यंत 6 प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच 12 पेक्षा जास्त प्रवासी जखमी (injured) झाले आहेत. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून लोकांचीही मोठी गर्दी जमली आहे.

Injured Admitted to Hospital : जखमींना रुग्णालयात दाखल

जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघात इतका जबरदस्त होता की पॅसेंजर ट्रेन मालगाडीवर चढली होती. घटनास्थळी प्रवाशांच्या किंचाळ्या आणि आरडाओरडामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Railway Accident : रेल्वे प्रशासन आणि स्थानिक मदत

रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी बचाव कार्य (relief operation) त्वरित सुरु केले. अपघातामुळे अनेक ट्रेन पर्यायी मार्गावर पाठवण्यात आल्या आहेत. अपघाताचे कारण अद्याप अज्ञात असून, रेल्वे तपासणी सुरु आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या अपघातासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

ही बातमी वाचा: