कोझिकोड : मल्लपूरम येथील विशेष पोस्को न्यायालयाने एका १२ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Crime News) केल्याच्या प्रकरणात तिची आई आणि आईचा प्रियकर (Crime News) या दोघांना १८० वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी ११.७० लाख रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती अशरफ ए. एम. यांनी मंगळवारी हा निकाल दिला. न्यायालयाने दोघांनाही बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO), भारतीय दंड संहिता आणि जुवेनाईल जस्टीस कायदा यांतील अनेक कलमान्वये दोषी ठरवले. पहिला आरोपी पळक्कडचा रहिवासी असून पीडित मुलीची आई तिरुअनंतपुरमची आहे.(Crime News) 

Continues below advertisement

Crime News: नेमकं प्रकरण काय?

विशेष सरकारी वकील सोमसुंदरन ए. यांच्या माहितीनुसार, विवाहित असलेली महिला आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहात होती. ती या आरोपीच्या संपर्कात फोनद्वारे आली आणि त्याच्यासोबत पळून गेली. दोघेही मुलीसह पळक्कड आणि मल्लपूरम येथे भाड्याच्या घरात राहत होते. या काळात, ३३ वर्षीय आरोपीने डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० आणि पुन्हा डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. मुलीची आई या सर्व गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारी आणि सहाय्य करणारी म्हणून दोषी ठरली.

Crime News: आईचे गुन्हे अधिक गंभीर

तिने केवळ अत्याचारांना मुकाट पाहिले नाही, तर मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवले, तिला बिअर पाजली, तसेच मुलीसोबतच्या दोघांनीही लैंगिक कृत्याच्या परिसीमा गाठल्या. मुलगी गप्प राहावी म्हणून तिला धमकावत तिने सांगितले की “तुझ्या मेंदूत सीसीटीव्ही चिप बसवली आहे, तू कोणाला काही सांगितले तर आम्हाला कळेल.” अनमंगड आणि वल्लीकपट्टा येथील भाड्याच्या घरांमध्ये राहत असताना त्यांनी मुलीवर सतत अत्याचार केले. आरोपींच्या क्रौर्याची पातळी गाठली होती.  तिच्या डोक्यात एक गुप्त कॅमेरा किंवा चिप बसवली आहे. जर तिने अत्याचाराची गोष्ट कोणाला सांगितली, तर त्यांना लगेच कळेल. या भीतीमुळे पीडितेने दीर्घकाळ कोणालाही काही सांगितले नाही. इतकेच नव्हे, तर अत्याचारापूर्वी तिला दारू पाजली जात होती, अश्लील व्हिडीओ दाखवले जात होते. जन्मदात्या आईने प्रियकराला या घृणास्पद कृत्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मदत केली.

Continues below advertisement

न्यायालयाने आरोपींना पोस्को कायद्याच्या कलम ५(l), ६(१), ५(n) आणि ५(p) सह ६(१) अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येक गुन्ह्यासाठी ४० वर्षांची सक्तमजुरी आणि दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय आयपीसी आणि जुवेनाईल जस्टीस कायद्यातील विविध कलमांखालीही शिक्षा देण्यात आली. दंड न भरल्यास आणखी २० महिन्यांची शिक्षा होईल.

Crime News: प्रकरण उघड कसे झाले?

ही घटना त्यावेळी उघडकीस आली, जेव्हा आरोपी महिला आपल्या पालकांविरुद्ध आधार आणि इतर कागदपत्रे देत नसल्याची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेली. पोलिसांनी महिलेच्या पालकांना प्रमाणपत्रे देण्यास सांगितले. जेव्हा ते महिलेच्या घरी पोहोचले आणि त्यांना त्यांच्या नातीला भेटायचं असल्याचं सांगितले तेव्हा आरोपींनी भेटू दिले नाही, शेजाऱ्यांनी त्यांना सांगितले की मुलीवर अत्याचार होत असून तिला अन्नही दिले जात नाही. त्यानंतर चाइल्डलाइनला माहिती देण्यात आली आणि मुलीला सुरक्षित केंद्रात हलवण्यात आले. तेथे सर्व सत्य उघड केले.

Crime News: पोस्को कायद्यातील झालेली सर्वाधिक कठोर शिक्षा

हे प्रकरण २०२१ मध्ये मल्लपूरम महिला पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक राजिया बंगालथ यांनी केला, तर उपनिरीक्षक संध्या देवी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपा यांनी सहकार्य केले. सरकारी पक्षाने २६ साक्षीदारांची साक्ष घेतली आणि ३३ कागदपत्रे सादर केली. न्यायालयाने दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पीडित भरपाई योजना अंतर्गत आणखी नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. दोन्ही दोषींना तवानूर कारागृहात ठेवण्यात आले असून, सर्व शिक्षा एकाचवेळी (concurrently) भोगायच्या आहेत. ही शिक्षा पोस्को कायद्यातील महिलेवर झालेली सर्वाधिक कठोर शिक्षा मानली जात आहे.