मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रशासनाकडून भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वर्षात देशवासियांचा रेल्वे प्रवास महागणार आहे. मात्र मुंबई लोकलच्या तिकीटदरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे न्यू ईयरच्या तोंडावर मुंबईकरांना ही मोठी गुडन्यूज आहे. उद्यापासून रेल्वेची भाडेवाढ लागू होणार आहे. एसी आणि नॉन एसी मेल आणि एक्स्प्रेसवर भाडेवाढ केली जाणार आहे.


नव्या भाडेवाढीनुसार नॉन एसी सेकंड क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा, स्लीपर क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा आणि फर्स्ट क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा अशी भाडेवाढ करण्यात आली आहे.


मेल एक्स्प्रेसच्या नॉन एसी डब्यांच्या तिकीटदरात प्रत्येक किलोमीटरमागे 2 पैश्यांची तर एसी डब्यातील तिकीट दरात प्रत्येक किलोमीटरमागे 4 पैश्यांची वाढ करण्यात आली आहे. ज्यांनी आधीच तिकीटं काढली आहेत, त्यांना ही दरवाढ लागू होणार नाही.


वाढलेले तिकीट दर पाहा