नवी दिल्ली :  देशात दिवसेंदिवसे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सातत्याने नियमांचे पालन करुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यामध्ये नागरिकांना कोरोनापासून कशा प्रकारे बचाव करता येईल यासंदर्भातील माहिती आयुष मंत्रालयाने सांगितली आहे. 


देशात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5488 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आयुष मंत्रालयाने खबरदारी म्हणून काही गाईडलाईन दिल्या आहेत. आयुष मंत्रालयाने नेमक्या कोणत्या गाईडलाईन  दिल्या आहेत ते पाहुयात...
  
कोरोना होण्यापासून बचावासाठी आयुरक्षा किट कशी असावी याबाबत आयुष मंत्रालयाने माहिती दिली आहे. 


१) 6 ग्रॅम चवनप्राश रोज एकदा
२) 75ml आयुष काढा दिवसातून अकदा
३) समशामणी वटी 500 मिली ग्रॅम दिवसातून दोनदा, अनुतैला एक ते दोन थेंब प्रत्येक नाकपुडीत दिवसातून एकदा.





कोरोना होण्यापूर्वी औषधांचा वापर


१) गुडुची घनवटी 500 mg दिवसातून दोन वेळा
२) अश्वगंधा 500 mg दिवसातून दोन वेळा


कोरोना झाल्यानंतर बचावासाठी आयुष 64 हे औषध लक्षणे नसणाऱ्या आणि हलक्या स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना फायदेशीर आहे. लक्षणे नसलेल्यांनी 500 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या दिवसातून दोनदा, तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी 500 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्याव्यात.
तसेच काबासूर कुडीनीर औषध पाण्यात उकळून घेऊ शकता. ते औषध दिवसातून दोन वेळा 5 ग्रॅम असे घ्यायचे आहे.


होमिओपॅथीद्वारे बचावासाठी आर्सेनिक एल्बुमिन घेता येणार आहे. १३९ स्टडीजच्या आधारे आयुष मंत्रालयाने कोरोनावरील उपचाराची ही नवी अॅडव्हायजरी जारी केली आहे. इम्युनिटी चांगली असल्यास कोरोनाविरोधात लढाई आणखी सोपी होणार असल्याचे आयुष मंत्रालयाने सांगितले आहे. त्याचबरोबर वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्कचा पावर करणे, हात स्वच्छ करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, लसीकरण करणे, सहक आकार घेणे तसेच इतर आरोग्य सेवांशी संबंधित नियमांचे पालन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे.