मुंबई : लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन नायिका मागणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येईल? याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी संशोधन करत आहेत. स्वतः स्वामी यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. तसेच याबाबात काही माहिती असेल तर सुचवा, असे आवाहनही स्वामींनी केले आहे.
स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मी सध्या लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचा अभ्यास करत आहे. एखाद्या मंत्र्याने प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन नायिकांची मागणी केली होती. त्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याअन्वये कारवाई करता येईल? याबाबत मी अभ्यास करत आहे. काही सूचना असतील तर कळवा. मी संशोधन करत असलेल्या सध्याच्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात ते उपयोगी पडेल."
प्रकल्पाला मान्यता पाहिजे, तर दोन बॉलिवूड नायिका पुरवा, अशी या मंत्र्याची मागणी आहे. परंतु स्वामींनी या मंत्र्याचे नाव जाहीर केलेले नाही. सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्वीटने मात्री राजकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. बॉलिवूडमध्येही नवा गॉसिप बॉम्ब फुटला आहे.
स्वामींच्या या ट्वीटमुळे काहींनी माजी मंत्र्याकडे बोट दाखवले आहे. तर काहींनी हा मंत्री सध्याचाच असल्याचे सांगितले.
याबाबत ज्येष्ठ वकील आभा सिंह म्हणाल्या की, "सुब्रमण्यम स्वामींनी जे आरोप लावले आहेत ते खूप धक्कादायक आहेत. या प्रकरणाची सखोल आणि गंभीर दखल घ्यायला हवी. स्वामी याबाबत जेव्हा खटला दाखल करतील तेव्हा त्याची चौकशी करण्यापेक्षा आत्ताच एफआयआर दाखल करुन त्याची योग्य चौकशी व्हायला हवी. हा केवळ आरोप नसून महिलांचा अपमान आहे."
मंत्र्याने लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन नायिका मागितल्या, कारवाईसाठी सुब्रमण्यम स्वामींचं संशोधन सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2019 06:02 PM (IST)
लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन नायिका मागणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येईल? याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी संशोधन करत आहेत.

Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -