दोन दिवसांपासून सुरक्षा आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी मेधा पाटकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. मात्र सुर्यास्तानंतर महिला आरोपी किंवा कैद्यांना जेलमध्ये न टाकण्याच्या नियमांची पोलिसांनी पायमल्ली केल्याचा आरोप होत आहे.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील चिखल्दा गावात मेधा पाटकर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत होत्या. 12 दिवसांपासून मेधा पाटकर सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या उंचीविरोधात उपोषणाला बसल्या होत्या.
विस्थापितांसाठी उपोषणाला बसलेल्या मेधा पाटकरांना अटक
अहिंसेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्या मेधा पाटकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याने सर्वच स्तरातून मध्य प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.