नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा बूट फेकण्याचा प्रयत्न झाला आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद सुरु होती. त्यावेळी एका तरुणाने केजरीवालांच्या दिशेने बूट भिरकावला.   अरविंद केजरीवाल हे दिल्लीत सम-विषम फॉर्म्युल्याबाबत पत्रकार परिषद घेत होते. त्यादरम्यान हा प्रकार घडला.   केजरीवालांच्या दिशेने बूट फेकणारा तरुण हा आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.