Facebook Followers : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक (Facebook) हे आज अनेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक फेसबुक हाताळत असतात. नव-नवीन फोटो शेअर करणे, भावना व्यक्त करण्यासह अनेक बाबी फेसबुकवर शेअर केल्या जातात. आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी युजर्स अनेक क्लुप्त्या वापरत असतात. परंतु, फेसबुकने आज बऱ्याच युजर्संना चांगलाच धक्का दिलाय. फेसबुकवरील अनेक युजरचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. ज्यांच्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या कमी होऊन फक्त 10 हजारांवर आली आहे. फक्त फेसबुक युजर्सचेच नाही तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या फॉलोअरमध्ये देखील लक्षणीय घट झाले आहे. 11 कोटी नऊ लाख फॉलोअर्स असलेल्या झुकेरबर्गचे आता केवळ 9 हजार 994 इतकेच फॉलोअर्स उरले आहेत. फरंतु, यातील काही युजर्सचे फॉलोअर्स रिकव्हर झाले आहेत. मार्क झुकेरबर्गचे देखील फॉलोअर्स आता पहिल्याएवढे दिसत आहेत.
जभरातील फेसबुक युजर्संना याचा फटका बसला आहे. याबाबत काही युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार केली आहे. एका बगमुळे फॉलोअर्स कमी झाल्याचे सांगण्यात येत अहे. फेसबुकवर सध्या तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटीचे अकाऊंट पाहिले तर तुम्हाला त्यात मोठ्या संख्येने फॉलोअर्स दिसतील. परंतु, त्यांचे अकाऊंट ओपन करून पाहिले तर त्यांचे फॉलोअर्स फक्त 10 हजार इतकेच दिसत आहेत. अभिनेते आशुतोष राणा यांनीही फेसबुकवर ही तक्रार केली आहे. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील ट्विट करून त्यांचे फॉलोअर्स कमी झाल्याचे सांगितले आहे. "फेसबुकने त्सुनामी निर्माण केली, ज्याने माझे जवळपास 900,000 फॉलोअर्स कमी झाले असून आता फक्त 9000 फॉलोअर्स राहिले आहेत. मला फेसबुकची कॉमेडी आवडली, असे ट्विट नसरीन यांनी केले आहे. नसरीन यांच्यासारखेच अनेक युजर्सनी सोशल मीडियावर अशा तक्रारी केल्या आहेत.
अभिनेत आशुतोष राणा यांनीही याबाबत तक्रार केली आहे. काल रात्रीपर्यंत त्यांचे सुमारे 4 लाख 96 हजार फॉलोअर्स असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर आज फक्त नऊ हजार फॉलोअर्स उरले आहेत.
अनेक युजर्समध्ये नाराजीचा सूर
सोशल मीडिया हे एक स्वतःचे जग आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री गाढ झोपेपर्यंत लोक फेसबुक आणि ट्विटरवर सक्रिय असतात. प्रत्येक लहानमोठ्या गोष्टी सगळेच सोशल मीडियावर शेअर करत असतात. परंतु, आता फॉलोअर्स कमी झाल्यामुळे अनेकांनी फेसबुकवरून आपले अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतालय. तर काही युजर्स आम्ही फेसबुक सोडणार असल्याचे बोलत आहेत.