Kerala Human Sacrifice Case : केरळमध्ये  (Kerala) एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या पथानामथिट्टा येथे गरीबी दूर करण्यासाठी (Human Sacrifice) दोन महिलांचा बळी देण्यात आलाय. याही पेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे या महिलांच्या मृतदेहाचे तुकडे करून  संशयितांनी ते शिजवून खाल्ले आहेत. नरबळीतून ही क्रूर हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

Continues below advertisement


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथानामथिट्टा येथे एका दाम्पत्याने गरीबी दूर करण्यासाठी तात्रिकाच्या सांगण्यावरून दोन महिलांचा बळी दिला आहे. हत्या केल्यानंतर संशयितांनी महिलांच्या मृतदेहाचे जवळपास 56 तुकडे केले आणि ते शिजवून खाल्ले.  पदमा आणि रोझलिन असे हत्या झालेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिलांना बांधून त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या घरातील गरीबी दूर करण्यासाठी करण्यात आली असून पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. भगवल सिंह, त्याची पत्नी लैला आणि तांत्रिक मोहम्हदी शफी अशी या आरोपींची नावे आहेत. चौकशीत पती-पत्नीने हत्येनंतर मृत महिलांचे मांस खाल्ल्याचे समोर आले आहे. 
 
केरळमधील कोच्ची शहराचे पोलिस आयुक्त नागराजू चमिलम यांनी दिलेल्या माहितीनुसार,  भगवल सिंह आणि त्याची पत्नी लैलाने मृत महिलांचे मांस खाल्ले आहे की नाही याची माहिती मिळवण्यासाठी फॉरेंसिक तपास सुरू आहे. हत्या झालेली रोजनिल ही जून महिन्यात बेपत्ता झाली होती. तर पदमा सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाली होती. पदमाचा शोध घेतला जात असताना या दोन्ही महिलांची हत्या झाल्याचे समोर आले. दोन्ही मृत महिलांचे फोन ट्रेस केल्यानंतर तांत्रिक मोहम्मद शफीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दोन्ही महिलांची हत्या केल्याचे कबूल केले आणि दोन्ही महिलांचे आपण अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली. 
 
तांत्रिक मोहम्मद शफी याने संशयित जोडप्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याने फेसबुकवर श्रेदेवी नावाने फेक अकाऊंट तयार केले होते. त्याने या जोडप्याला गरीबीतून बाहेर पडण्यासाठी नरबळीचा उपाय सांगितला. त्यानंतर नरबळी देण्यासाठी त्यानेच दोन महिलांचा शोध लावला.   


विकृतीचा कळस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक शफी हा लैंगिक विकृत होता. त्याने रोजनिल हिला एका अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी 10 लाख रुपये आणि पदमाला सेक्स वर्कर बनण्यासाठी 15 हजार रुपयांची ऑफर दिली होती. त्यानंतर रोजनिल हिला शूटींगच्या बहाण्याने बेडवर झोपवले. त्यानंर त्याच अवस्थेत त्याने तिला बेडसोबत बांधले आणि चाकूने वार करून तिची हत्या केली. तर पदमाने आपले पैसे मागितले त्यावेळी तिला दाव्याने बांधले. यातच ती बेशुद्ध झाली. त्यानंतर शफीने तिची देखील हत्या केली. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर दोन्ही महिलांच्या गुप्तांगामध्ये चाकूने वार करण्यात आले आणि रक्त फरशीवर शिंपडण्यात आले. त्यानंतर दोन्ही महिलांच्या शरीराचे तुकडे करून जमीनीत पूरण्यात आले.