हैदराबाद : पाणीपुरीला नाही म्हणणारी व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही. खवय्यांचा हीच आवड लक्षात घेऊन कर्नाटकमधल्या मणिपाल विद्यापीठातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पाणीपुरी बनवणारं यंत्र विकसित केलं आहे.
रस्त्यावर पाणीपुरीवाल्या भय्याच्या हातची पाणीपुरी खाताना अनेकांना 'हायजिन'चा प्रश्न पडतो. काही वेळा पाणीपुरी खाण्यासाठी सरसावलेले हात अनेक असतात, मात्र देणारा दुबळा पडतो. त्यामुळे यावर मात करणारं हे मशिन पाणीपुरी बनवण्याच्या सर्व प्रक्रिया पार पाडतं.
पाणीपुरीची पुरी घेणं, ती फोडून भोक पाडणं, त्यात सारण भरणं आणि पाणीपुरीच्या पाण्यात बुडवून पाणीपुरी तयार करणं इथपर्यंत सगळी प्रक्रिया या यंत्रावर होते. त्यानंतर पाणीपुरी रेडी होऊन तुमच्या पुढ्यात सादर होते. कोणी किती पाणीपुऱ्या खाल्ल्या याची नोंदही या यंत्रावर होते.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या अनोख्या यंत्रानं हैदराबादेतल्या इंक मेकर्स फेस्टीवलमध्ये पहिला क्रमांक पटकावला. सहा महिन्यांच्या संशोधनानंतर साहस गेंबाली, सुनंदा सोमू, नेहा श्रीवास्तव आणि करिश्मा अग्रवाल या चौघांनी मिळून हे पाणीपुरीचं यंत्र विकसित केलं.
पाणीपुरीवाल्या भय्याला टक्कर, मशिनवर रेडीमेड पाणीपुरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2017 05:23 PM (IST)
पाणीपुरीची पुरी घेणं, ती फोडून भोक पाडणं, त्यात सारण भरणं आणि पाणीपुरीच्या पाण्यात बुडवून पाणीपुरी तयार करणं इथपर्यंत सगळी प्रक्रिया या यंत्रावर होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -