Karnataka Suicide Case : आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वॉर्डनचा मोबाईन न दिल्याने वसतिगृहात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे ही दुःखद घटना घडली आहे. पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती 14 वर्षांची असून तो बेंगळुरू येथील होसाकोटे येथील रहिवासी होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ न शकल्याने गळफास 


मुलांची मानसिकता समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या निष्पाप हृदयाला काय त्रास होतो, त्यांनी कोणती पावले उचलली पाहिजेत याची काळजी घेणे आवश्यक आहे. असेच काहीसे मंगळुरूच्या बाबतीत घडले जेथे 14 वर्षांच्या मुलाने आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने स्वतःचा जीव घेतला. मंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने 11 जून रोजी आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, म्हणून त्याने वॉर्डनकडे फोन मागितला, परंतु वॉर्डनने त्याला फोन दिला नाही. आणि मुलाने गळफास घेतला. 


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या घरातून फोन आल्यानंतरही वॉर्डनने त्यांना घरच्यांशी बोलायला दिलं नाही. यामुळे दु:खी झालेल्या मुलाने सुसाईड नोट लिहून गळफास लावून घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुलाने गळफास लावून घेतला. दुसऱ्या दिवशी वसतिगृहातील इतर मुलांना तो लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि त्यांनी वसतिगृह व्यवस्थापनाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुलाच्या कुटुंबीयांनीही तातडीने वसतिगृह गाठले. 


या घडलेल्या प्रकारात एक गोष्ट मात्र जाणवते की, मुलं नेमका काय विचार करतात? त्यांची मानसिकता काय आहे हे पालकांनी तसेच ज्येष्ठांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी दोघांमध्ये संवाद असायला हवा. 


महत्वाच्या बातम्या :