Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आदल्या दिवसाच्या तुलनेत किंचिंत घट पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत 8084 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी 8582 कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात एकूण 5 लाख 24 हजार 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्ण
देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यातील मुंबईत कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. राज्यात 2946 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 1803 कोरोना रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एकूण 1432 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 46 हजार 337 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.92 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. 






दिल्लीतही कोरोनाचा आलेख वाढताच


दिल्लीत रविवारी दिवसभरात 735 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दर तीन टक्क्यांच्या वर पोहोचला. त्यानंतर शनिवार आणि रविवारी पुढील दोन दिवस संसर्गाचा दर चार टक्क्यांच्या वर पोहोचला. पण रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढण्याऐवजी कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे.


तामिळनाडूत 1332 सक्रिय रुग्ण


तामिळनाडूत 249 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये 1332 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहे. चेन्नईमध्ये 124 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या