Woman Harassment Case: इंग्रजी अपशब्द वापरून महिलेला धमकावणे (Threatening woman) एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला महिलेसाठी इंग्रजी अपशब्द वापरून तिचा लैंगिक छळ (sexually harassing) केल्या प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने ( Magistrate Court) शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरुद्ध या व्यक्तीने दिल्ली न्यायालयात (delhi court) धाव घेतली होती. मात्र दिल्ली न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाचा हा निर्णय कायम ठेवला आहे. आरोपीने हा शब्द अपमानाच्या उद्देशाने वापरल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये एका महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. ऑगस्ट 2022 मध्ये ट्रायल कोर्टाने महिलेला धमकावणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी या व्यक्तीविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने आयपीसीच्या कलम 354A, 509 आणि 506 अंतर्गत त्याच्यावर आरोप निश्चित केल्यानंतर आरोपीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.


काय आहे प्रकरण? 


महिलेने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने 9 मे 2019 रोजी महिलेसाठी "f**k off" असे अपशब्द वापरले आणि तिला धमकावले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय शर्मा यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले की, या न्यायालयाला आरोप निश्चित करताना कोणताही बेकायदेशीरता, अनियमितता किंवा अधिकारक्षेत्रातील त्रुटी आढळत नाही. याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.  


न्यायालयाने काय म्हटले? 


अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय शर्मा यांनी आपल्या 6 पानी आदेशात 29 ऑक्टोबर रोजी ही याचिका फेटाळली होती. पुढे घटनेची वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहता, असे म्हणता येणार नाही की, याचिकाकर्त्याचा हेतू केवळ तक्रारदाराला जाण्यास सांगण्याचा होता. भारतीय समाजात, शाळा-कॉलेजांमध्ये अशा शब्दांचा वापर एखाद्याला दूर जाण्यासाठी बोलायला केला जात नाही. सर्वसाधारण अर्थाने हा शब्द अपमानास्पद आणि आक्षेपार्ह आहे. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की याचिकाकर्त्याच्या वकिलाच्या युक्तिवादात योग्यता आढळत नाही. या शब्दाचा डिक्शनरी अर्थ सोडणे किंवा जाणे असा केला आहे. हा शब्द लैंगिक टिप्पणी आहे.