Plane Crash : टांझानियामध्ये एक प्रवासी विमान कोसळले आहे. या विमानात 49 प्रवासी होते. अपघातग्रस्त विमान व्हिक्टोरिया तलावात बुडाले आहे. यातील 23 प्रवाशांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 


टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात रविवारी एक प्रवासी विमान कोसळले. यामध्ये आतापर्यंत 23 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मवांझा ते बुकोबा हे विमान कोसळले आहे. या विमानात 49  प्रवासी होते. यातील  23 जणांना वाचवण्यात यश आले आहे.






टांझानियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे रविवारी पहाटे एक प्रवासी विमान व्हिक्टोरिया तलावात कोसळले. हे विमान वायव्येकडील बुकोबा शहरात उतरणार होते, त्याच दरम्यान हा अपघात झाला. यासोबतच प्रवाशांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  


विमान कोसळल्यानंतर बचाव कार्य सुरू आहे. हे विमान कोसळल्यांतर ते तलावात बुडाले आहे. बोटीच्या सहाय्याने सुरक्षा दलांचे पथक मदत आणि बचाव कार्य करत आहेत.   


"विमानतळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर एका प्रिसिजन एअरच्या विमानाला अपघात झाला. विमानातील प्रवाशांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती तत्काळ मिळालेली नाही. परंतु स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार या विमानात  49 लोक होते. सुरक्षा पथकांकडून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अशी माहिती प्रादेशिक पोलिस कमांडर विल्यम मवाम्पघले यांनी यांनी दिली.  


दरम्यान, टांझानियाची सर्वात मोठी खासगी विमान कंपनी प्रेसिजन एअरने एक निवेदन जारी करून अपघाताबाबत माहिती दिली आहे. बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली असून दोन तासांत अधिक माहिती जाहीर केली जाईल, असे एअरलाइन्सने म्हटले आहे.