मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी केरळ भवनमध्ये हातात चाकू घेऊन राडा
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2018 01:32 PM (IST)
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना भेटण्यासाठी त्याने हा प्रकार केला. विमल राज असं या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील केरळ भवनमध्ये एका व्यक्तीने हातात चाकू घेऊन राडा घातला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना भेटण्यासाठी त्याने हा प्रकार केला. विमल राज असं या 46 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या एका हातात चाकू होता, तर दुसऱ्या हातात कागदपत्र होती. सुरक्षा रक्षकांनी मनाई करुनही या व्यक्तीने आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये घुसण्याचा प्रवेश करताच या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी मागून येऊन पकडलं आणि त्याचे हात बांधले. या व्यक्तीच्या हातात मिळालेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट झालं आहे, की तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. त्यामुळे त्याला उपचारासाठी दिल्लीतील शहादरा येथील Institute of Human Behaviour and Allied Sciences मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील जंतर-मंतर रोडवरील केरळ भवन केरळ सरकारचं अतिथीगृह आहे, जिथे राज्याचे मुख्यमंत्री, आमदार आणि वरीष्ठ अधिकारी थांबतात. पाहा व्हिडीओ :