अहमदाबाद: वर्च्युअल दुनियेत आज अनेकजण गुरफटलेले दिसून येतात. पण याच वर्च्युअल दुनियेमुळे एका व्यक्तीला तब्बल 4 लाख रुपये गमवावे लागले आहेत.


एका 50 वर्षीय विवाहित व्यक्ती मागील काही दिवसांपासून एका प्रसिद्ध डेटिंग वेबसाइटवर चॅटिंग करत होता. एका खास अकाउंटवरुन त्याची एका महिलेशी चॅट सुरु होतं. त्यांच्यामध्ये बरंच बोलणं सुरु होतं. हळूहळू त्यांच्यातील दुरावा कमी झाला आणि एक ऑक्टोबरला त्या व्यक्तीला एक जोरदार झटका बसला.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, कथित महिलेने (चॅट सुरु असलेली महिला) त्या व्यक्तीला सांगितलं की, माझ्या मोबाइलमध्ये 100 रुपयाचं रिचार्ज कर. पण रिचार्ज झालंच नाही. तर त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहारासाठी येणारा ओटीपी देखील रद्द झाला. तो काही समजू शकेल त्याचआधील त्याच्या अकाउंटमधून चार लाख कुणीतरी काढूनही घेतले होते.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, एका महिलेचा त्यानंतर फोन आला. जर पैसे गायब झाल्याची पोलिसात तक्रार केलीस तर याचे परिणाम वाईट होतील. कारण की, वेबसाइटवर महिलेसोबत झालेलं त्याचं चॅट सार्वजनिक करण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या त्या व्यक्तीनं अखेर पोलिसात तक्रार केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.