Mumbai Delhi Air India Flight : विमानात मारहाण, क्रूसोबत बाचाबाची आणि महिला प्रवाशावर लघवी केल्याच्या घटना आपण यापूर्वी ऐकल्या आहेत. हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून वाढतच आहेत. विमानात प्रवाशाकडून पुन्हा एकदा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाच्या (Air India) विमानात एका प्रवाशाने लघवी (Urinate) आणि शौच (Defecating) केली. इतकंच नाही तर तो पूर्ण फ्लाईटमध्ये थुंकत होता. मुंबई-दिल्ली फ्लाईटदरम्यान (Mumbai-Delhi Air India Flight) ही घटना घडली आहे. या प्रवाशाने सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्ससमोर हे गैरवर्तन केलं. या प्रवाशाला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. 


शौच आणि लघवी करत फ्लाईटमध्ये थुंकला


मुंबई-दिल्ली एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला येथील विमानतळावर शौच आणि लघवी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पायलटने 24 जून रोजी दिल्ली IGI विमानतळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरनुसार, मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AIC866 फ्लाइटमध्ये एक प्रवासी सीट क्रमांक 17F वर प्रवास करत होता. या प्रवाशाने विमानाच्या 9 DEF वर शौच आणि लघवी केली आणि थुंकला.


एफआयआरमध्ये काय म्हटलंय?


प्रवाशावर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आरोपी प्रवासी आफ्रिकेत स्वयंपाकी (Cook) म्हणून काम करतो. या प्रवाशाने विमानात शौच आणि लघवी केल्याचा आरोप आहे. 24 जून 2023 रोजी मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआयसी 866 फ्लाइटमध्ये प्रवासी राम सिंह सीट क्रमांक 17F वर बसला होता. त्याने विमानात शौच, लघवी केली आणि थुंकला. फ्लाइटच्या केबिन क्रूने या घटनेवर आक्षेप घेतला. केबिन क्रू अमन वत्सने पायलट-इन-कमांड कॅप्टन वरुण संसारे यांना घटनेची माहिती दिली. याची माहिती तातडीने एअर इंडियाला पाठवण्यात आली. विमान उतरताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. विमानातील इतर प्रवाशांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. कॅप्टन वरुण संसारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 294/510 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


मद्यधुंद प्रवाशाकडून महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी


एअर इंडियाच्या (Air India) विमानात प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची घटना याआधी समोर आली होती. 6 डिसेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट नंबर 142 मध्ये. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केली. या प्रकरणी पुरुष प्रवाशाने लेखी माफी मागितल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


एअर इंडिया विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसवणं महागात, पायलटचा परवाना एक वर्षासाठी रद्द