हैदराबादमध्ये मला हरवून दाखवा, ओवेसींचे मोदी-शाहांना आव्हान
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2018 04:17 PM (IST)
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून काढणारे वक्तव्य केले आहे. ओवेसींनी, “ हैदराबादमध्ये एमआयएम विरुद्ध मोदी आणि शाह यांनी निवडणूक लढवून दाखवावी” असं आव्हान दिलं आहे.
हैद्रराबाद : 2019 च्या निवडणुका जसजशा जवळ येत आहे तसतसा निवडणुकांचा रंग चढत चालला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून काढणारे वक्तव्य केले आहे. "हैदराबादमध्ये एमआयएमविरुद्ध मोदी आणि शाह यांनी निवडणूक लढवून दाखवावी," असं आव्हान ओवेसींनी दिलं आहे. ओवेसी एवढेच बोलून थांबले नाही तर त्यांनी काँग्रेसला सुद्धा हे आव्हान दिले आहे. "काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन जरी माझ्याविरोधात लढले तरी ते मला हरवू शकणार नाहीत." ओवेसींच्या या वक्तव्यावरुन हैदराबादमधून निवडून येण्यावर त्यांचा ठाम विश्वास असल्याचे दिसून येते. ओवेसी नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. याआधी सुद्धा ‘ओवेसींनी भाजपचे संबित पात्रा बच्चा असून माझी लढाई ही त्याच्या बापाशी आहे’ असे विधान केले होते.