नवी दिल्ली : राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह आहे. तर तिकडे गुजरातमध्ये नवरात्री पर्वाची धामधूम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीही मनोभावे या उत्साहात सहभागी होतात. मोदींचा  आजपासून 9 दिवस नवरात्री उपवास आहे. केवळ पाणी पिऊन मोदी हा उपवास करतात. सध्या आसाम दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी कामाख्या मंदिरात जाऊन पूजा केली.   या नऊ दिवसात मोदींचा उपवास असला, तरीही ते दैनंदिन कामकाज करतच राहणार आहेत. मोदी आजही आसाममध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. आसाममध्ये मोदींच्या आज चार सभा आहेत, इथे ते संबोधित करतील.   या रॅलीपूर्वी मोदींनी कामाख्या मंदिरात जाऊन पूजा केली. लोकसभा निवडणुकीदरम्यानही मोदी कामाख्या मंदिरात दर्शनासाठी आले होते.   हिंदू पंचांगानुसार आजपासून नववर्षाची सुरुवात होते. विक्रम संवत 2073 चा आज पहिला दिवस आहे. भारतीय इतिहासात 'विक्रम संवत'ला सर्वात लोकप्रिय संवत मानलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी जनतेला नवनर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.