Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. 'भारत मात की जय' असं बच्चन यांनी ट्वीट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट खूप विशेष आहे. जी-20 (G-20) निमंत्रण पत्रिकेवर भारत (Bharat) नाव वापरल्याची बातमी आल्यावर अवघ्या काही मिनिटांत बच्चन यांनी 'भारत माता की जय' असं ट्वीट केलं आहे.






नेमकं प्रकरण काय? 


राजधानी दिल्लीत जी 20 (G 20) परिषदेची तयारी सुरू आहे. या जी-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' (President Of India) ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' (President Of Bharat) असे लिहिलेले आहे. त्यामुळे देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत करणार असल्याची शंका काँग्रेसला आली. त्यानंतर एकीकडे काँग्रेस आक्रमक झाली तर दुसरीकडे इंडियाचा उल्लेख भारत करावा, अशी संपूर्ण देशाची मागणी असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं. या सगळ्या प्रकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांनीदेखील 'भारत माता की जय' असं सूचक ट्वीट केलं.



बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सूटच ट्वीटवर इंडिया हा नेहमीच भारत राहिला आहे, देशावर माझं प्रेम आहे, 'भारत माता की जय'सह तुम्ही 'जय भीम, जय संविधान', एक भारत..श्रेष्ठ भारत...अखंड भारत, इंडिया म्हणजेच भारत आहे आणि भारत म्हणजेच इंडिया आहे, बच्चनसाहेब आपल्याला दोन्ही नावांवर अभिमान असायला हवा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.


अमिताभ बच्चन यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर #भारत ट्रेंड करत आहे. अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल होत असून काही मिनिटांतच 1500 पेक्षा अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे. भारत हे नाव जी- 20 च्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिण्यास गैर काहीच नाही. तरीही, कदाचित अचानक बदल केल्यानं काही विरोधक यावर टीका करत आहेत


अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती 15'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 'ऊंचाई', 'गुडबॉय' आणि 'ब्रह्मास्त्र' हे त्यांचे सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दीपिका पदुकोण आणि प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात आता ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. 


संबंधित बातम्या


G20 Summit 2023: घटनेतून 'इंडिया' नाव वगळण्याच्या हालचाली? जी-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसचा आक्षेप