Yoga Day Disrupted : आज जगभरात शांततेत योग दिन साजरा केला जात असताना मालदीवमध्ये मात्र खळबळजनक घटना घडली आहे. या ठिकाणी संतप्त जमावाने मालदीवमधील राष्ट्रीय फुटबॉल गलोल्हू स्टेडियममध्ये घुसून केंद्र सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोंधळ घातला आहे. या संतप्त जमावाने आवाज करत स्टेडियममध्ये घुसून तोडफोड सुरू केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
या ठिकाणी संतप्त जमाव झेंडे उंचावून ध्यानस्थ बसलेल्या लोकांना स्टेडियममधून हाकलून देत आहे. तसेच या ठिकाणी सर्व वस्तू अस्थावस्थ पडलेल्या दिसत आहेत. मागून जोरात आवाज येत आहेत. गलोल्हू स्टेडियममध्ये ही घटना घडली आहे. या संदर्भात मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे की, मालदीव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योग करणाऱ्या काही लोकांनी स्टेडियममध्ये घुसलेल्या गर्दीला धमकावल्याचा आरोपही केला जात आहे. त्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. भारतीय सांस्कृतिक केंद्राने भारताच्या युवा, क्रीडा आणि सामुदायिक विकास मंत्रालयाच्या सहकार्याने स्टेडियममध्ये योग आणि ध्यानाचा हा कार्यक्रम सकाळी 6:30 वाजता आयोजित केला होता. त्यातही अनेकांनी सहभाग घेतला होता. मात्र, संतप्त जमावांच्या हल्ल्यामुळे हा कार्यक्रम संपूर्णपणे उध्वस्त झाला. अनेक राजनैतिक अधिकारी, सरकारी अधिकारी आणि मालदीवचे मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :