Mallikarjun Kharge Targets Central Govt : 1962 च्या चीन युद्धातील (India China War 1962) नायक मेजर सैतान सिंह यांचे स्मारक तोडण्यात आले आहे. शहीद मेजर सैतान सिंह यांचे स्मारक (Major Shaitan Singh Memorial) असलेला भाग आता भारत-चीन दरम्यान बफर झोन (India China LAC) झाला आहे. यावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge ) यांनी संताप व्यक्त केला असून भाजप सरकार निशाणा साधला आहे. भाजपने पुन्हा एकदा त्यांची देशभक्ती बनावट असल्याचा पुरावा दिला असल्याचे खरगे यांनी म्हटले.
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, भारत मातेचे शूर सुपुत्र, परमवीर चक्र आणि 1962 च्या रेझांग-ला युद्धातील महान वीर मेजर शैतान सिंग यांचे लडाख येथील चुशुल येथील स्मारक पाडल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे, त्यांनी म्हटले की, तुम्ही चीनकडे डोळेझाक केलीत, शूरवीरांच्या बलिदानातील रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा अपमान केला असल्याचे त्यांनी म्हटले. चीनसोबतच्या चर्चेनंतर आता बफर झोन भारतीय हद्दीत आल्याने वीर जवानांचे स्मारक तोडले गेले का, असा सवालही त्यांनी केला.
मोदी सरकारचे अपयश
2014 पासून पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात 20 बैठका झाल्यानंतरही, मोदी सरकार मे 2020 पूर्वी डेपसांग प्लेन, पॅंगॉन्ग त्सो, डेमचौक आणि गोगरा-हॉटस्प्रिंग भागात भारताला यथास्थिती राखण्यात मदत करण्यात अपयशी ठरले का ठरले असा सवालही खरगे यांनी केला.
जवानांचे सर्वोच्च बलिदान देशाचा गौरव
गलवानमध्ये लष्कराच्या 20 जवानांनी प्राणांचे बलिदान दिल्यानंतही पंतप्रधान मोदी यांनी चीनला क्लीन चिट दिली होती, हे खरं आहे ना? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी केला. रेझांग लाचे रक्षण करण्यासाठी मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली 13 कुमाऊँच्या सी कंपनीच्या 113 शूर सैनिकांनी दिलेला सर्वोच्च बलिदान हा देशाचा अभिमान असल्याचे काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले.
चीनसमोर गुडघे टेकले
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, भाजपने मेजर शैतान सिंह यांचे स्मारक उद्धवस्त करून पुन्हा एकदा बोगस देशभक्त असल्याचा पुरावा दिला आहे. सरकारने चीनसमोर गुडघे टेकणे ही बाब अतिशय दु:खद असल्याचेही खरगे यांनी म्हटले.
नुकतेच लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे सदस्य खोंचोक स्टॅनजिन सांगितले की, मेजर शैतान सिंग यांचे स्मारक आता बफर झोनमध्ये आले आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक छायाचित्र देखील शेअर केले, ज्यामध्ये असे दिसून येते की हे स्मारक ऑक्टोबर 2020 पर्यंत भारतीयांच्या ताब्यात होते. त्यावेळी कुमाऊँ रेजिमेंटच्या 8 व्या बटालियनने त्याचे नूतनीकरण केले होते.