मुंबई: मुंबई अग्निशमन दलाच्या तब्बल 175 किमी दूर जाऊन अटीतटीच्या काळात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. 5 जुलै रोजी दादरा-नगर हवेलीत भिलोसा इंडस्ट्रियल इस्टेटच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. मदतीसाठी मुंबई अग्निशमन दलाला थेट दादरा-नगर हवेलीतून कॉल आला.

 

175 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी मुंबई अग्निमशन दल पोहोचलं आणि 18 तास फायर फायटिंग करुन आगीवर नियंत्रण मिळवलं. सुरुवातीला स्थानिक अग्निशमन दलानं प्रयत्न केले पण भीषण आग आटोक्यात आली नाही.

 

आगीची तीव्रता लक्षात घेता इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली आणि आग विझवण्यासाठी मदत मागितली. मुंबई अग्निशमन दलातील 7 जणांची टीम 2 फायर इंजिन घेऊन दादरा-नगर हवेलीला रवाना झाले आणि अंदाजे 50 एकर परिसरात पसरलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.