नवी दिल्ली : देशभरात पतंजलीचा बोलबाला सुरु असतानाचं पतंजली बिस्किटमध्ये मैदा आढळून आला आहे. यामुळे पतंजली उद्योग समुहाचे प्रमुख रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी रामदेव बाबांनी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी दरम्यान तक्रारदार आणि राजस्थान सरकारकडून उत्तर मागवले आहे. पंतजली आपली बिस्किटे मैदाविरहित असल्याची जाहिरात करतं. मात्र, एस. के. सिंह नावाच्या एका व्यक्तीने पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा आढळल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, बिस्किटांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यात प्राणिजन्य पदार्थही आढळून आले आहेत. त्यामुळे रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.