मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी महिंद्राने आपली लोकप्रिय गाडी 'टीयूव्ही-300' ब्रॉन्झ ग्रीन रंगात बाजारात आणली आहे. या विशेष रंगातील गाडीला फक्त मागणीनुसारच बनवलं जाणार आहे.
या विशेष एडिशनसाठी जास्त पैसेही मोजावे लागणार नाहीत. कंपनी या गाडीवर फ्रीडम फेस्ट ड्राईव्ह ऑफरच्या माध्यमातून 55 हजार रुपयांपर्यंतचे फायदेही देत आहे.
रंगाशिवाय या गाडीच्या डिझाईन आणि इंजिनामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 1.5 लीटर एम-हॉक सीरीजचं डीझेल इंजिनही देण्यात आलं आहे. या इंजिनाचे 6 व्हेरिएंट उपलब्ध असतील. दोन इंजिनांसोबत स्वयंचलित गिअरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे.